वार्ताहर /कणकुंबी
शिक्षण खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या विभागीय पातळीवरील जांबोटी विभागाच्या माध्यमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धांना कणकुंबी येथील श्री माउली विद्यालयाच्या पटांगणावर बुधवारपासून सुरुवात झाली. स्पर्धांचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी होते. प्रारंभी बेळगाव जिल्हा अक्षरदासोह अधिकारी लक्ष्मण यकुंडी, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगावचे अध्यक्ष सुनील मुतगेकर, कणकुंबी ग्राम पंचायत अध्यक्षा दिप्ती गवस, उपाध्यक्षा नीलिमा महाले व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी माउलीदेवी विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष राजाराम गावडे, पारवाड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष भिकाजी गावडे, जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ व माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष वासुदेव गावडे यांच्या हस्ते फोटोपूजन झाले.
ईशस्तवन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची सुऊवात झाली. मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांनी स्वागत केले. आमदार विठ्ठल हलगेकर व अक्षरदासोह अधिकारी लक्ष्मण यकुंडी यांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. जांबोटी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. सडेकर, पारवाड ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष संजय पाटील, जायंट्स ग्रुपचे सुनील मुतगेकर, लक्ष्मण यकुंडी व आमदार हलगेकर यांची भाषणे झाली. यावेळी क्रीडा ध्वजारोहण माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत खोरवी, क्रीडाज्योत प्रज्वलन जायंट्स ग्रुपचे सेव्रेटरी लक्ष्मण शिंदे तर शपथ ग्रहण गजानन डिचोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जायंट्स ग्रुपचे विजय बनसूर, अविनाश पाटील, देविदास गावडे, मुख्याध्यापक एस. आर. अवताडे, ग्रा. पं. माजी अध्यक्ष मंगेश नाईक, रमेश खोरवी, माजी उपाध्यक्ष नंदकुमार गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. एन. एस. करंबळकर यांनी सूत्रसंचलन केले. विजय नंदिहळ्ळी यांनी आभार मानले.









