सांखळी : दत्तवाडी सांखळी येथील नगरपालिकेच्या प्रभाग दहामधील जिवाजी स्मृती संकूल या इमारतीच्या रस्त्यावर पेवर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगरपालिका निधीतून करण्यात येणाऱ्या या विकास कामाचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक आनंद काणेकर यांच्याहस्ते करण्यात आला. या भागातील लोकांना आवश्यक असलेला विकास होत असल्याचे नगरसेवक काणेकर यांनी म्हटले. यावेळी नगरसेविका शुभदा सावईकर, जिवाजी स्मृती संकुल अध्यक्ष तिमा खोबरेकर, शिरीष नाईक, शशांक नाईक, अर्जुन मळीक, कंत्राटदार ब्राजील डिसोझा, दशरथ आजगावकर व इतरांची उपस्थिती होती. नगरपालिकेचा कार्यकाळ आता संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वी या प्रभागातील लोकांना विकासाच्या बाबतीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात यश आले आहे. लोकांना आवश्यक असलेला विकास त्यांना विश्वासात घेऊन दिलेला आहे. त्यामुळे समाधान वाटत आहे, असे नगरसेवक आनंद काणेकर यांनी म्हटले. जिवाजी स्मृती संकुलाचे अध्यक्ष तिमा खोबरेकर यांनी या कामाबद्दल आनंद व्यक्त केला व आभार मानले. नगरसेवक आनंद काणेकर यांनी व इतरांनी श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला.
Previous Articleस्वतंत्र नारळ विकास मंडळासाठी कृषीमंत्री प्रयत्नशील
Next Article पुरुषांनी महिलांना योग्य साथ देण्याची गरज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









