आचरा पारवाडीतील पायवाटेच्या कामाला सुरुवात
आचरा प्रतिनिधी
आचरा गावचे नूतन सरपंच जेरॉन फार्नांडिस यांनी पदभार स्विकारल्यानंतर विकासकामे मार्गी लावण्याचे काम हाती घेतले आहे. काही महिने असलेला प्रशासन कारभार त्यानंतर आचारसंहिता यामुळे आचरा गावातील विकासकामे खोलंबलेली मंदावलेली होती. शुक्रवारी सरपंच पदाचा पदभार स्वीकारताच सरपंच फार्नांडिस यांनी कामे मार्गी लावण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. शनिवारी त्यांनी आचरा पारवाडी येथील पाण्याची विहीर येथून जाणाऱ्या पायवाटेच्या कामाचा शुभारंभ केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, चंद्रकांत कदम, लिपिक नरेश परब, चंद्रकांत मसुरकर, सुधाकर पळसंबकर, रविंद्र पळसंबकर, चंदू मुळये, संतोष सावंत, सुधीर परब नंदकुमार परब, बाबा बोरकर, अमर पळसंबकर, माई गावडे, श्रेया धुरी, प्रसाद मुळये, बापू कदम, श्रीपाद सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.