अदा शर्मा दिसणार अॅक्शन अवतारात
अदा शर्माच्या ’कमांडो’ या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये अदा शर्मासोबत प्रेम परीजा हा कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. प्रेम परीजा या वेबसीरिजद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. अदा शर्माचा केरळ स्टोरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. या वेबसीरिजची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. या सीरिजमध्ये अदा ही अॅक्शन अवतारात दिसून येणार आहे. या सीरिजची कहाणी कमांडोच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. यात जैविक युद्धाचीही पार्श्वभूमी दाखविण्यात आली आहे. ही सीरिज 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अदा, प्रेम यांच्यासह तिग्मांशू धूलिया, अमित सियाल, श्रेया सिंह चौधरी, इश्तियाक खान आणि मुकेश छाबडा हे कलाकारही दिसून येणार आहेत. अदा शर्मा हिने यापूर्वी कमांडो फ्रेंचाइजी चित्रपटांमध्ये काम केले हेते. ही सीरिज 11 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदशिंत होणार आहे.









