पुणे / प्रतिनिधी :
पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या कमांडंटपदाचा कारभार ले.जन डॉ .नरेंद्र कोतवाल (Dr. Narendra Kotwal) यांनी शुक्रवारी स्वीकारला.
जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून डॉ. कोतवाल यांनी 1985 साली एमबीबीएस पूर्ण केले. 1992 साली त्यांनी ‘एएफएमसी’तून एम.डी पदवी संपादन केली. दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून त्यांनी एम. फिलही केले आहे. आपल्या 35 वर्षाच्या दीर्घ वैद्यकीय सेवेत त्यांनी अनेक मोठय़ा पदांवर तसेच अनेक संरक्षण संस्थांमध्ये काम केले आहे. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2016 साली ‘विशिष्ट सेवा मेडल’ तसेच 2019 साली ‘सेना मेडल’ ने सन्मानित करण्यात आले आहे.








