कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापुरातील शिवाजी रोडवरच्या एका तिकटीचे नाव आराम तिकटी आहे. कोल्हापुरात पद्माळा रेसकोर्सवर ज्यावेळी घोड्यांच्या शर्यती होत होत्या .त्या शर्यतीतील घोड्यावर पैसे लावण्यासाठी या तिकटीवर एजंटांचा वावर असायचा . मुंबईतील रेस कोर्स वरच्या घोड्यावरही येथून पैसे लावता येत होते . त्यामुळे या तिकटीवर रेस म्हणजे आशा निराशेचा जुगारच चालायचा. रात्री मांसाहारी जेवणाचा घमघमाट पसरलेला असायचा. बडोदेकर हॉटेल, मावशीचे श्रीकृष्ण हॉटेल आणि पैलवानाचे हॉटेल पांढ्रया तांबड्यासाठी भरलेले असायचे . मेरवाडे यांच्या जागेत एक चित्रपट गृहही होते . त्याचे नाव कमल टॉकीज होते. इंग्रजी चित्रपट तेथे प्राधान्याने दाखवले जात. अशा आराम तिकटीय आणखी एक वैशिष्ट्या असे होते की ,या तिक टीवरच्या तीन मजली इमारतीत एक कॉलेज होते
तेथे शिक्षण कशाचे तर टेलरिंग व्यवसायाचे .अगदी मापे कशी घ्यायची येथ पासून फिटिंग पर्यंत सारे या कॉलेजमध्ये शिकवले जायचे. आणि श्रीपतराव काकडे हे कॉलेज चालवायचे. खुद्द काकडे यांनीठ टेलर अँड कटिंग अकॅडमी लंडनठचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता व टेलरिंग चे धडे कोल्हापूरकरांना देण्यासाठी त्यांनी हे कॉलेज सुरू केले होते .
कोल्हापूर ही संस्थांनची राजधानी . आणि ब्रिटिश राजवटीमुळे तत्कालीन अधिकारी कर्मच्रायांची मोठी वसाहत होती .याशिवाय पोलंडचे निर्वासीतही कोल्हापुरात वळीवडे येथे राहत होते . त्यामुळे कपडे शिलाई व्यवसाय चांगला होता .आणि रेडिमेड कपडे मिळण्याचा तो काळही नव्हता . त्यामुळे कपड्यासाठी चांगल्या टेलरवरच अवलंबून असायचे .
1923 च्या सुमारास श्रीपतराव काकडे यांनी नवीन टेलर व्यावसायिक तयार व्हावेत म्हणून टेलरिंग कॉलेज काढले आराम तिकटीला आता जिथे मंगल लाईट हाऊस आहे त्या इमारतीत हे कॉलेज होते . तेथे शर्ट ,सूट, पॅन्ट शिवण्याचे शास्त्राrय ज्ञान दिले जात होते . खुद्द श्रीपतराव काकडे यांनी शिंपीशास्त्र म्हणून एक त्रैमासिक ही चालू केले होते . त्यांनी शिवलेले कपडे राज घराण्यात, चित्रपटात वापरले जात होते . याशिवाय अधिकारी वर्गाच्या कपड्यासाठीही श्रीपतराव काकडे विशेष मानले जात होते . काकडे यांनी लंडनचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम श्रेणीत यश मिळवले होते . परीक्षेचा भाग म्हणून त्यांनी एक ब्लेझर शिवून दिला होता . त्यासाठी कापड व ब्लेझरचे माप लंडनहून पाठवले गेले होते व ते ब्लेझर एक दोरीचाही फरक न करता काकडे यांनी शिवले होते व ते लंडनला पाठवले होते.
कपड्याचा रंग , इस्त्राr ,शरीराची चिटकून राहणारे कापड, फिटिंग यावरच प्रत्येकाची प्रथम दर्शनी कपड्यामुळे छाप पडते . त्यामुळे संस्थांनशी संबंधित लोक, अधिकारी कपड्याबाबत अतिशय जागरुक राहत होते . काहीही शिवले आणि ते अंगात घातले असे होत नसे . त्यामुळे टेलर मंडळींना खरोखरच मापात जराही इकडे तिकडे न होणारे कपडे शिवून द्यावे लागत होते . काळात प्रसिद्ध होते आणि टेलरिंग कॉलेजमुळे नवे लोक टेलर व्यवसायाकडे वळत होते. त्यामुळे काय झाले? तर कोल्हापुरात टेलरिंगचा व्यवसाय चांगला रुजला. कपडे शिवायला दिले की पावती देण्याची पद्धत सुरू झाली. कपडे तयार झाले का असे टेलरला दहा वेळा विचारायला जायची पद्धत बंद झाली. पावतीवर लिहिलेल्या तारखेला टेलर कपडे शिवून देऊ लागले.
काळाच्या ओघात रेडिमेडचा जमाना सुरू झाला. तयार पॅन्ट शर्ट मिळू लागले .त्याचा थोडाफार परिणाम टेलर व्यवसायावर झाला. पण टेलरनी माप घेऊन शिवलेले कपडे आणि रेडिमेड कपडे त्यात काही ना काही फरक राहतच गेला. आणि पुन्हा कपड्यासाठी टेलर व्यवसाय आवश्यक झाला.
आता रेडीमेडचा जमाना आहे .पण तरीही टेलर व्यवसाय टिकून आहे. कारण फक्त सणवार, लग्न सोहळा यासाठीच कपडे शिवायचे ही पद्धत बंद झाली आहे .त्यामुळे चांगल्या टेलर मंडळींना ब्रयापैकी काम आहे . काही काळानंतर फॅशन बदलते .एखाद्या चित्रपट कलाकाराने घातलेल्या कपड्यासारखे कपडे शिवून देण्याची मागणी होते .एखाद्या खेळाडूंनी घातलेल्या कपड्याची फॅशन होते . कोल्हापुरात आजही ब्रयापैकी टेलर व्यवसाय चालू आहे . बेल बॉटम पँटचा जमाना संपला आहे . नॅरो किंवा पेन्सिल असा पॅन्टचा
जमाना आहे . फॅशन म्हणून शर्टही आखूड आखूड होत चालले आहेत .त्यांच्या रंगाला शोभणारा शर्टचा रंग असावा ही रंग संगतीही बाजूला ठेवली गेली आहे . आणि अशा बदलाच्या काळातही टेलर परिस्थितीशी जुळवून घेत उभा आहे .
- लाईटवर चालणारी मशीन
कपडे शिवायची मशीन काही वर्षांपूर्वी पर्यंत पायाने चालवली जात होती . आता बहुतेक मशीन लाईटवर चालणारी आहेत. फॅशन कशी आहे हे दाखवणारी पुस्तके टेलरकडे आहेत . अमुक एका रंगाचे कापड आपल्या अंगावर कसे दिसेल हे दाखवण्याची सुविधा टेलर मंडळी देत आहेत .








