सावंतवाडी / प्रतिनिधी
come Through the efforts of Vaibhav Naik, funds of Rs.84 lakhs were approved under Jaljeevan Mission in Pavashi village
आ. वैभव नाईक यांच्या हस्ते कामांची झाली भूमिपूजने
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून पावशी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेसाठी ८४ लाख रु.निधी मंजूर झाला आहे. तर जनसुविधा अंतर्गत पावशी मिटक्याचीवाडी शाक्य नगर येथे गटार बांधणे या कामासाठी ४ लाख रु.निधी मंजूर झाला आहे. आ. वैभव नाईक यांच्या हस्ते आज या कामांची भूमिपूजने करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांचे आभार मानले.
यामध्ये पावशी घाडीधुरीवाडी, सीमावाडी नळ योजना तयार करणे ३६ लाख,पावशी बोरभाटवाडी स्वतंत्र पाईप लाईन १६ लाख, पावशी बेलनदी स्वतंत्र पाईप लाईन ८ लाख, पावशी मिटक्याची पाईप लाईन २४ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, सरपंच वैशाली पावसकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, ग्रा. प. सदस्य निकिता शेलटे, सौ.खोत, सौ. दळवी,वसंत भोगटे,युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, युवासेना उपतालुकाप्रमुख सागर भोगटे, कृष्णा तेली,संतोष अडूलकर, काका भोगटे, प्रसाद शेलटे, मनीष तोटकेकर, गणेश वायंगणकर,चित्रा पावसकर, तुषार शेलटे,उमेश सावंत, सीमा खोत,ओमकार शेलटे,बंड्या खोत, लोचन तोटकेकर,सदानंद पावसकर आदींसह पावशी ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









