मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे तऊणांना आवाहन ; सांताक्रूज येथे मैदानाच्या सिंथेटिक टर्फचे लोकार्पण

पणजी : पद्मश्री सारख्या पुरस्कारांनी क्रीडापटूंना गौरविण्यात येत आहे. यावरून क्रीडा क्षेत्राला असलेले महत्व लक्षात घेऊन तऊणांनी या क्षेत्रात भवितव्य घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सांताक्रूझ येथे क्रीडा मैदानावर सुमारे 6 कोटी ऊपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सिंथेटिक टर्फच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, आमदार ऊडाल्फ फर्नांडीस यांच्यासह क्रीडा सचिव, संचालक, क्रीडा प्राधिकरण कार्यकारी संचालक आदी अन्य मान्यवर उपस्थित होते. मंत्री गोविंद गावडे यांच्या प्रयत्नांतून आतापर्यंत राज्यात विविध ठिकाणी क्रीडाक्षेत्रात मोठ्या साधनसुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातूनच पेडणे पासून काणकोणपर्यंत अनेक ठिकाणी इनडोअर, आऊटडोअर स्टेडियम, स्वीमिंग पूल, तयार करण्यात आले आहेत. तरीही आजच्या काळात ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्यासारखे क्रीडापटू तयार होत नाही, अशी खंत क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केली होती, परंतु ती जिद्ध, चिकाटी ही स्वत: तऊणांमध्ये असली पाहिजे, तसेच पालकांनीही आपल्या मुलांमध्ये ती जिद्ध, निर्माण करून खेळण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली पाहिजे, त्याशिवाय विविध क्रीडा संघटनांनीही तऊणांमध्ये उत्साह, चैतन्य निर्माण केले पाहिजे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले. सरकार सुविधा निर्माण करते, आदर्श असे शारीरिक शिक्षक-प्रशिक्षकही उपलब्ध करते, परंतु केवळ तेवढ्याने भागणार नाही. या सर्व सोयी सुविधांचा लाभ घेऊन चांगली बुद्धीमत्ता असलेले खेळाडू तयार झाले पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
येत्या ऑक्टोबर महिन्यांपासून राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात सुमारे 42 क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन घडणार आहे. यातील काही क्रीडा प्रकारात गोव्यातील तऊणही सहभागी होणार आहेत. त्यांना आतापासूनच त्यासंबंधी तयारी करावी लागणार असून अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या सुविधांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. क्रीडा क्षेत्रात तऊणांनी पुढे यावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रोत्साहन देत आहे. पद्मश्री सारख्या पुरस्कारांनी क्रीडापटूंना गौरविण्यात येत आहे. त्यावरून सरकार क्रीडा क्षेत्राला किती महत्व देते त्याची प्रचीती येते. म्हणुनच तऊणांनी क्रीडा क्षेत्र म्हणजे नगण्य न मानता त्यातही स्वत:चे भवितव्य घडविता येते याची जाणीव ठेवून ती संधी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासंदर्भात राज्यात सुरू असलेली साधनसुविधा निर्मिती आणि अन्य कामांची तयारी जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेली आहे. लवकरच या स्पर्धाची तारीखही जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धांचा विद्यार्थी, तऊण यांच्यासह पालकांनीही लाभ घ्यावा. त्यातून प्रेरणा घेऊन राज्यात एखादा चांगला क्रीडापटू तयार होऊ शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या मैदानावर आजपासून प्रारंभ होणाऱ्या रोमियो आणि व्हिक्टोरिया स्मृती फूटबॉल चषकाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्टेडियमचा टर्फ तसेच नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा सचिव स्वेतिका सचन यांनी स्वागत केले. क्रीडामंत्री गोविंद गावडे, आमदार ऊडाल्फ फर्नांडीस, यांनीही विचार मांडले.
कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे
दरम्यान, सांताक्रूज मतदारसंघात अनेक भागात स्वच्छतेचा अभाव दिसून येतो, त्याकडे पंचायत पातळीपासून प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि स्वत: लोकांनीही जागृत राहून लक्ष दिले पाहिजे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम आम्हालाच भोगावे लागतात, त्यामुळे रस्त्याच्या बाजूला कचरा न फेकता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याकडे प्रत्येकाचा कटाक्ष असला पाहिजे. तसे झाल्यास एक आदर्श मतदारसंघ म्हणून सांताक्रूजचे नाव पुढे येईल. त्याचबरोबर ’स्वच्छ भारत, नितळ गोंय’ संकल्पनेसही त्यातून हातभार लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









