विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर : अलायन्स क्लब, रेडक्रॉस-बिम्सवतीने रक्तदान शिबिर
बेळगाव : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे स्वयंप्रेरणेने रक्तदान करण्यास पुढे आले पाहिजे. आपणही विद्यार्थी जीवनात अनेक वेळा रक्तदान केले असून अनेक रक्तदान शिबिरे भरविल्याचे विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी बिम्स सभागृहात सांगितले. अलायन्स क्लब, रेडक्रॉस व बिम्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरामध्ये 300 हून अधिक जणांनी रक्तदान केले. प्रारंभी अलायन्स इंटरनॅशनलचे चेअरपर्सन अॅङ दिनकर शेट्टी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला विधानपरिषद सदस्य मंजुनाथ भंडारे, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाग्यश्री कालकुंद्रीकर यांनी केले तर अॅङ रविंद्र तोटेगार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला संचालिका डॉ. नवीना शेट्टीगार, बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमारशेट्टी, अधीक्षक डॉ. ए. बी. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ. आर. जी. पाटील व इतर उपस्थित होते.









