सरड्याला मागे टाकेल असा मासा
पृथ्वीवरील अनेक जीव अत्यंत विचित्र अन् अनोखे असतात. सरडा असा एक प्राणी आहे, जो स्वत:चा रंग बदलत असतो. परंतु वैज्ञानिकांनी आता एका अनोख्या माशाचा शोध लावला आहे. हा मासा स्वत:चा रंग बदलू शकतो. वैज्ञानिकांनी नव्या अध्ययनात हॉगफिश नावाच्या माशाचा शोध लावला आहे. या माशाला लॅचनोलाईमस मॅक्सिमस नावाने ओळखले जाते. हा मासा मृत्यूनंतरही स्वत:चा रंग स्थितीनुसार बदलू शकतो हेच याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे. हा मासा सागरी टेकड्यांमध्ये राहतो. उत्तर पॅरोलिनापासून ब्राझीलपर्यंत अटलांटिक महासागरात हा मासा आढळून येतो. हा मासा स्वत:च्या शत्रूंपासून रक्षणासाठी आणि स्वत:च्या साथीदाराला संकेत देण्यासाठी रंग बदलत असावा असे मानले जात आहे. अनोखा मासा मृत्यूनंतरही स्वत:चा रंग बदलत असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये एक नवे संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनानुसार तज्ञांनी माशाच्या विविध हिस्स्यांवर प्रकाशाच्या प्रभावाला मायक्रोस्कोपीच्या वापराद्वारे निर्धारित केले आहे. या प्रक्रियेत त्वचा रंग देणाऱ्या क्रोमॅटोफोरच्या खाली एसडब्ल्यूएस1 नावाचे प्रकाश रिसेप्टर्स काम करत असावेत असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. संशोधनानुसार माशांना रिसेप्टर्स फीडबॅक देतात की त्यांच्या त्वचेच्या वेगवेगळ्या हिस्स्यांमध्ये कुठे आणि कशाप्रकारे परिवर्तन होत आहे.
डोळ्यांप्रमाणे या जीवांची त्वचा प्रकाशाबद्दल संवेदनशील असते. परंतु ही त्वचा डोळ्यांप्रमाणे काम करत नसल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. तज्ञांनी या संशोधनाच्या मदतीने हॉगफिश माशाचा विकास, अधिवास आणि अन्य वर्तनाबद्दल शोध लावला आहे. तसेच याच्या वेगाने बदल घडवून आणण्याच्या क्षमतेबद्दल जाणून घेतले आहे. समुद्रात असे अनेक जीव आढळतात ज्यात स्वत:चा रंग बदलण्याची क्षमता असते. यामुळे त्यांना बदलत्या तापमानानुसार स्वत:मध्ये बदल करण्यास, साथीदाराला आकर्षित करण्यास आणि लपण्यास मदत मिळते. युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ पॅरोलिनाच्या संशोधकांनी माशाच्या शरीरातील पेशींना क्रोमॅटोफोरस म्हटले जाते, ज्यात रंग द्रव्य, क्रिस्टल किंवा छोट्या परावर्तक प्लेट्स असतात, असे सांगितले. या प्लेट्स माशांना रंग बदलण्यास सक्षम करतात.









