वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली ज्युडो मंडळाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र क्लबचे कर्नल राजपाल सिंग यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून इंडियन ज्युडो अकादमीचे नवीन चौहान यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी दिल्ली ज्युडो मंडळाची विविध पदांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. ज्युडो क्षेत्रामध्ये कर्नल राजपाल सिंग यांना प्रशासकीय अनुभव चांगलाच असल्याने त्यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली. दिल्ली ज्युडो अकादमीच्या खजिनदारपदी सोनम यांची निवड झाली आहे.









