प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव एनसीसी मुख्यालयाचे नूतन कमांडर म्हणून कर्नल मोहन नाईक यांनी 31 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. मुख्यालयाचे मावळते कमांडर कर्नल के. श्रीनिवास निवृत्त झाले असून त्यांच्या जागी कर्नल मोहन काम पाहतील.
बेळगाव एनसीसी मुख्यालय हे देशातील मोठे मुख्यालय असून या अंतर्गत 12 एनसीसी बटालियन आहेत. यापैकी तीन गोवा राज्यात आहेत. या अंतर्गत 250 शाळा व 22 हजारहून अधिक विद्यार्थी एनसीसीचे छात्र आहेत.
कर्नल मोहन नाईक हे बेळगाव-हिंडलग्याचे रहिवासी असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये तर जीआयटी अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. 1996 मध्ये ‘कॉर्प्स ऑफ सिग्नल’ या विभागातून लेफ्टनंट पदावरून त्यांनी लष्करी सेवेला प्रारंभ केला. 27 वर्षांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीर, आसाम व लडाख या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे.









