मालवण / प्रतिनिधी
कोळंब ग्राम पर्यटन विकास समितीतर्फे सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात आली होती व आवाहन करण्यात आलं होतं की आपण सर्वांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आपल्या गावातील शाळा व ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे या विनंती आव्हानाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामस्थांकडून मिळालेला असून या स्वच्छते मोहिमेमध्ये गावातील सर्व वयोगटातील ग्रामस्थांनी सहभाग घेऊन सहकार्य केले व यापुढेही असे उपक्रम असतील तर आम्ही सर्वजण एकत्र येऊन सहभाग नोंदवू असे आश्वासन सर्वांनी दिले व ग्राम विकास होण्यासाठी असे उपक्रम व इतरही उपक्रम होणे आवश्यक आहे हे सर्वांनीच मान्य केले…
या स्वच्छते मोहिमेमध्ये गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ सिया धुरी या आवर्जून उपस्थित राहिल्या व सर्वांबरोबर साफसफाई करण्यासाठी मैदानात उतरल्या तसेच अपूर्वा प्रिया लोके हिने स्वच्छतेसाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी कांदे पोहे तसेच चहाची व्यवस्था केली त्याबद्दल कोळंब ग्राम पर्यटन विकास समितीतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.गणेश खडपकर यांनी शाळेतील परिसरात वाढलेले रान झुडपे कट्टर मशीनचा सहायाने कट करून चांगले सहकार्य केल्याबद्दल कोळंब ग्राम पर्यटन विकास समिती तर्फे आभार मानण्यात आले…
आजच्या या स्वच्छते मोहिमेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांची नावे खालील प्रमाणे श्री संदीप शेलटकर अध्यक्ष, शैलेश प्रभू गावकर उपाध्यक्ष, श्री संदीप लाड उपाध्यक्ष, श्री प्रमोद कांडेकर सचिव, श्री प्रसाद भोजने खजिनदार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते श्री सुनील फाटक, श्री प्रवीण देसाई, श्रीकृष्ण धुरी, प्रियाल लोके, पंकज नेरकर, विशाल फणसेकर, चेतन भोजने, विठोबा ढोलम, राजू हडकर, जयेश फाटक, सुशांत भोजने, शरद लोके, आबा भोजने, निखिल नेमळेकर, सचिन पराडकर, कुणाल चोडणेकर, जयेश पराडकर, यश कोयंडे, तेजस आरोंदेकर, साहिल पराडकर, प्रसाद डीचोलकर, भूपेश ढोलम, नारकर, तुषार शेलटकर, यश शेलटकर, रिया शेलटकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते…









