थेट शेताच्या बांधावर जात विद्यार्थी करणार शेतीत मदत !
सहयोग ग्राम विकास मंडळाच्या वतीने तळवडे येथे ८ जानेवारी रोजी ,शेतकरी बागायतदार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर मंडळाच्या वतीने व सावंतवाडी तालुक्यातील महाविद्यालये व माध्यमिक शाळांच्या सहकार्याने जुलै 2023 मध्ये कॉलेज ,शाळा ते शेतकरी बांध हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शेती पासून दूर जाणारा युवा वर्ग शेतीकडे वळावा,त्यांना शेतीविषयक आवड निर्माण व्हावी , शेतीतील नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी ,शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मदत व्हावी आणि शाळा , महाविद्यालयांना समाजपयोगी उपक्रमात सहभागी होता यावे. या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे . या उपक्रमाअंतर्गत पाच ते आठ विद्यार्थ्यांचा गट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्याच्या गरजेप्रमाणे शेतीविषयक कामात त्यांना मदत करणार आहेत. तसेच गरज भासल्यास तज्ज्ञ मार्गदर्शक शेतकऱ्यांना व मुलांना शेतीविषयक मार्गदर्शन करणार आहेत . या उपक्रमामध्ये सावंतवाडी तालुक्यातील ,श्री पंचम खेमराज महाविद्यालय ,भोंसले फार्मसी कॉलेज ,भोंसले पॉलीटेकनिक कॉलेज ,राणी पार्वती हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज ,जे बी नाईक कॉलेज ,कळसुळकर हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज ,श्री रवळनाथ विद्या मंदिर ओटवणे ,भाई साहेब माध्यमिक विद्यालय माजगाव ,नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलि,मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव , कोळगाव माध्यमिक विद्यालय कोळगाव ,व्ही .पी .कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल ,माडखोल विद्यालय माडखोल ,श्री जनता विद्यालय आणि जुनिअर कॉलेज तळवाडे अश्या जवळ जवळ चौदा कॉलेजेसी आणि माध्यमिक विद्यालया मधून जवळ जवळ चारशे ते पाचशे विध्यार्थी विद्याथीनी सहभागी होणार आहेत तरी या उपक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येते आहे.
या उपक्रमाचे उदघाटन शनिवार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी १०. ३० वाजता मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे होणार आहे . आणि जवळच असणाऱ्या शेतात प्रात्यक्षिक होणार आहे. तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रेन कोट वाटप करण्यात येणार आहे .हा उपक्रम पंधरा दिवसासाठी राबवण्यात येईल. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक भाई केसरकर ,युवराज लखम राजे भोंसले ,माजी आमदार राजन तेली , भोंसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष श्री अच्युत सावंत भोंसले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच वरील कॉलेज ,माध्यमिक शाळांच्या संस्थानचे पदाधिकारी ,प्राचार्य , मुख्याध्यापक , शिक्षक व विद्यार्थी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे .ज्या शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी आपल्या शेतीच्या कामापूर्वी दोन ते तीन दिवस अगोदर नोंदणी करणे गरजेचे आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक प्राध्यापक दिलीप गोडकर =9423301799









