बेळगाव प्रतिनिधी – जिल्हाधिकाऱ्यांनी मिरवणूक निघणाऱ्या रस्त्यांची शहरांमधून दुचाकी वरून फेरी मारून पाहणी केली. त्याचबरोबर विसर्जन करण्यात येणाऱ्या रस्त्याची ही पाहणी त्यांनी केली आहे त्यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी , अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर व इतर अधिकारी उपस्थित होते. कपिलेश्वर तलाव, जक्किन होंडा तलाव येथे जाऊन पाहणी केली. याचबरोबर खडेबाजार, रामलिंग खिंड, टिळक चौक परिसरात रस्त्यांची पाहणी केली. लोंबकळणाऱ्या विद्युत तारा तसेच मिरवणूकिला अडथळा निर्माण होणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची अधिकाऱ्यांना सूचना त्यांनी केली आहे.
Previous Articleवेंगुर्ला-मठ येथील परिचारिका सायली गावडेचा खून
Next Article कढईमधे बनवा झटपट खुसखुशीत नानकटाई









