बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करून सरकारी बसमधून प्रवास करण्याचा संदेश दिला आहे. नंदगड (ता. खानापूर) येथे जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांनी परिवहन मंडळाच्या बसमधून तिकीट काढून प्रवास केला. जिल्हाधिकाऱ्यांना सरकारकडून विशेष वाहन उपलब्ध आहे. असे असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आपले वाहन सोडून इतर अधिकाऱ्यांबरोबर बसमधून नंदगडपर्यंत प्रवास केला. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध खात्याचे अधिकारी हजर राहणे सक्तीचे आहे. त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांनी तिकीट काढून बसने प्रवास केला.
Previous Articleसार्वजनिकसह वैयक्तिक समस्यांच्या अनेक तक्रारी
Next Article जनावरांना आरोग्य सुविधा पुरविण्यात पशुसखींचा हातभार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









