सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
प्रकृती अस्वास्थामुळे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
आज सोमवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे कार्यालयात हजर होऊन त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स अटेंड केली त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉ .शाम पाटील, डॉ आकरेकर व इतर डॉकटर यांच्या मार्फत उपचार सुरु आहेत.









