संपूर्ण ड्रेस स्वच्छ असला तरी कॉलर वरचे हट्टी डाग अनेकदा जात नाहीत. यामुळे कित्येकदा शर्ट देखील खराब होऊ शकतो. आज आपण हे कॉलरचे डाग कसे काढायचे हे जाणून घ्या.
भांडी धुण्यासाठी डिश डिटर्जंट वापरले जाते. पण हे शर्टवरचे हट्टी डाग देखील सहजपणे काढून टाकते. कारण त्यात नैसर्गिक लिंबाचा रस असतो. शर्टची कॉलर डिश डिटर्जंटने थंड पाण्यात भिजवा. त्यानंतर, जर तुम्ही चांगले घासले तर डाग निघून जाईल.
घामामुळे शर्टच्या कॉलरवर पिवळे डाग पडतात. हे डाग घालवण्यासाठी शाम्पू खूप उपयुक्त आहे. कोणताही शैम्पू कॉलरला लावावा आणि चांगले चोळावे. मग कपडे धुवावे.
लिंबाचा रस जर तुमच्या घरी लिंबू असेल तर त्याचा वापर करा. लिंबाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. कपड्यांतील घाण काढून टाकण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. डिटर्जंट मिसळलेल्या पाण्यात शर्टची कॉलर भिजवा. पाच मिनिटे थांबा आणि धुवा. डाग निघून जाईल.
बेकिंग सोडा देखील कॉलरमधील घाण काढून टाकण्यास मदत करतो. प्रथम शर्ट पाण्यात भिजवा. आता डाग असलेल्या भागावर बेकिंग सोडा पसरवा आणि दोन मिनिटे घासून घ्या. तुम्हाला दिसेल की डाग निघून जाईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









