सध्या बेळगाव शहराबरोबर संपूर्ण जिल्हा सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे त्रस्त असून, अनेक अप्रिय घटना घडत आहे.
बेळगाव वडगाव कल्याण नगर येथे मुसळधार पाऊसामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या सह कार्यकर्ते महादेव पाटील यांनी जातीने लक्ष देऊन पाहणी केली.
प्रेमा परशराम ढगेन्नावर, प्रसाद बसवराज माळी, रेणुका पांडुरंग सोनट्टक्की यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी यासाठी तहसिलदार व तलाठी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांशी बोलणी केली.