नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. राजधानी दिल्लीतील थंडीतही प्रचंड वाढ झाली असून गेल्या 23 वर्षातील उच्चांक गाठल्याचे आयएमडीने म्हटले आहे. तसेच 14 जानेवारीपासून राजधानीत पुन्हा थंडी वाढू शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यासोबतच पंजाब आणि हरियाणामध्ये हिमवर्षावाची शक्मयता व्यक्त केली आहे.
हिमाचलच्या अनेक भागात बुधवारीही पारा मायनसमध्ये राहिला. मंडी जिह्यात तापमान उणे 2 वर पोहोचले. 11 वाजेपर्यंत लोक धुक्मयाच्या गर्तेत होते. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे बुधवारी रात्रीपासून राज्यात हवामानात बदल झाला. येथील किन्नौर, लाहौल स्पीती आणि कुल्लू जिह्यांच्या उंच भागात हिमवृष्टीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. शिमला, चंबा, कांगडा, मंडी या उच्च उंचीच्या भागातही पुढील 3 दिवस जोरदार हिमवृष्टीनंतर तापमानात आणखी घट होऊ शकते.
छत्तीसगडमध्ये उत्तरेकडील वाऱयाचा प्रभाव अजूनही कायम आहे. गेल्या 48 तासांत रात्रीच्या तापमानात 2 ते 3 अंशांनी फरक पडला आहे. रात्रीच्या तापमानात किंचित घट होण्याची शक्मयता असली तरी पुढील आठवडाभरात फारशी घट होण्याची शक्मयता नसल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. पंजाबमध्ये भटिंडा येथे सर्वात थंड तापमान आहे. येथे पुन्हा कमाल तापमान 9 अंशांवर तल किमान तापमान देखील 2.4 अंशांवर आले.
जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या वरच्या भागात बर्फवृष्टी आणि पावसाची शक्मयता आहे. त्याचा परिणाम पंजाबमध्येही होणार आहे. बिहारच्या सर्व भागात थंडीचा प्रभाव कायम आहे. भागलपूर, बांका, सिवान, मोतिहारी, फारबिसगंज, नवादा या आठ जिह्यांमध्ये कडाक्मयाची थंडी होती. तर पाटणा, छपरासह 22 जिह्यांमध्ये थंडीचे दिवस आणि थंडीची लाट कायम आहे.









