कोल्हापूरः
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढतो आहे. जसजसा नोव्हेंबर महिना पुढ सरकतो आहे, तसतसे हवामान अधिक थंड होत चालले आहे. बंगालच्या उपसागरावर चक्रिवादळ आणि ला निना मुळे वातावरण थंड होत आहे. यामुळे दिवसा उष्ण आणि रात्री थंड हवामान तयार होत आहे.
राज्यातील पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात वाढत्या थंडीची नोंद झाली आहे. येत्या पाच दिवसात किमान तापमानात घसरण होण्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शविला आहे. पुण्यात किमान तापमानाची १० अंश इतकी नोंद झालेली आहे. देशातील किमान तापमानची नोंद ऋषिकेश येथे ८.१ अंश इतकी झाली आहे.
अरबी समुद्रातील कोमोरिन जवळ चक्रीवादळ वारा आणि, केरळजवळील आग्नेय अरबी समुद्रातील पंखांचे नमुने हवामानावर प्रभाव टाकत आहेत. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात घसरण झालेली आहे.








