एका नाण्यात येतील अनेक मर्सिडीज कार
जगातील सर्वात मूल्यवान नाणे कुठले याचे उत्तर बहुतांश जणांना देता येणार नाही. परंतु काही नाण्याची मूल्यं हजार किंवा लाखात नसून त्याहून अनेक पटीने अधिक आहे. जगातील सर्वात महागडे नाणे सेंट गॉडन्स डबल ईगल असून त्याचे डिझाइन ऑगस्ट्स सेंट गॉडन्स यांनी केली हेते. हे नाणे 1907-1933 दरम्यान तयार करण्यात आले हेते आणि 4,45,000 नाण्यांचीच निर्मिती करण्यात आली होती. यातील केवळ 12 नाणीच आता शिल्लक आहेत. अमेरिकेत झालेल्या एका लिलावात याच्या एका नाण्याची किंमत 163 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठरली आहे.
तर सर्वाधिक महाग नाण्याच्या बाबतीत अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या फ्लोइंग हेयर सिल्वर डॉलरचा दुसरा क्रमांक लागतो. या नाण्याची निर्मिती 1794 मध्ये करण्यात आली होती आणि केवळ 1,758 नाणीच तयार करण्यात आली होती. सध्या जगात यातील केवळ 6 नाणी शिल्लक राहिली आहेत. एका लिलावात यातील प्रत्येक नाण्याला 107 कोटी रुपयांची बोली लागली होती.

ब्रेशर डबलून कॉइन देखील जगातील सर्वात महाग नाण्यांमध्ये समाविष्ट होते. 1787 मध्ये इफ्रेम ब्रेशर यांनी याची निर्मिती करविली होती. ब्रेशर हे न्यूयॉर्कमधील एक ज्वेलर्स होते, जगात अशाप्रकारची केवळ 7 नाणी होती. अमेरिकेत तयार करण्यात आलेले हे पहिले सोन्याचे नाणे हेते. याच्या एका नाण्याची किंमत सुमारे 80.89 कोटी रुपये इतकी आहे. महागड्या नाण्यांमध्ये एडवर्ड 3 फ्लोरिनचा चौथा क्रमांक लागतो. याची निर्मिती इंग्लंडचे राजे एडवर्ड तृतीय यांनी करविली होती. स्वत:च्या खास डिझाइनमुळे हे नाणे अत्यंत दुर्लभ असून मूल्यवान देखील मानले जाते. एका लिलावादरम्यान या नाण्याची किंमत 55.08 कोटी रुपये ठरविण्यात आली. सौदी अरेबियात तयार करण्यात आलेल्या उमय्यद गोल्ड दिनाराला जगातील 5 व्या क्रमांकाचे सर्वात महागडे नाणे मानले जाते. उमय्यद साम्राज्याच्या काळात या नाण्याची निर्मिती करण्यात आली होती. याच्या एका नाण्याची किंमत 43.78 कोटी आहे. 1979 मध्ये पहिल्यांदा तयार करण्यात आलेल्या कॅनेडियन गोल्ड मॅपल लीफला सहाव्या क्रमांक्राचे मूल्यवान नाणे मानले जाते. हे नाणे 99 टक्के शुद्ध सोन्याद्वारे तयार करण्यात आले होते. वर्षभरात केवळ एकच नाणे तयार केले जायचे. एका लिलावादरम्यान या नाण्याला 42.95 कोटी रुपयांची किंमत मिळाली होती.









