Skin Care Tips : एक कप कॉफी तुमचा सर्व थकवा दूर करते. ती प्यायल्याने शरीरात लगेच ऊर्जा निर्माण होते. कॉफी पिण्याव्यतिरिक्त ती चेहऱ्यावर लावण्यासाठी देखील वापरली जाते. कॉफी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कॉफी त्वचेला घट्ट करते. यासोबतच चेहऱ्यावर चमकही आनते. आज आम्ही तुम्हाला कॉफी लावण्याचे फायदे सांगणार आहोत.
काळी वर्तुळे कमी करण्यासाठी
आजकाल डार्क सर्कलची समस्या अनेकांना सतवते. यामागे अनेक कारणे आहेत. काही वेळा काही आजारामुळेही असे होते. काही वेळी बराच वेळ फोनवर किमवा लॅपटॉपवर अधिक काम केल्यामुळे तर पुरेशी झोप घेत नसल्या कारणाने काळी वर्तुळे तयार होतात. ती कमी करण्यासाठी तुम्ही कॉफीचा फेस पॅक वापरू शकता यामुळे निश्चितच तुम्हाला फायदा होईल.
काळी वर्तुळे कमी करण्यासाठी असा फेस पॅक बनवा
काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काॅफीची मदत होते. यासाठी २ टेबलस्पून कॉफीमध्ये १ चमचा मध मिक्स करा. याची चांगली पेस्ट करून घ्या. आता ही पेस्ट डोळ्यांखालील डार्क सर्कल भागावर लावून घ्या. आता २० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
मुरुम कमी करण्यासाठी काॅफीचा वापर होतो
चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यासाठी ३ चमचे कॉफी आणि २ चमचे ब्राऊन शुगर मिक्स करून पेस्ट बनवा. आता त्यात ३ चमचे खोबरेल तेल घाला. हे मिश्रण एकजीव करून घ्या. आता हा स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि चांगले मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. या स्क्रबमुळे पिंपल्सची समस्या दूर होते.
कॉफी एलोवेरा फेस मास्क
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि पिंपल्स कमी करण्यासाठी कॉफी अॅलोवेरा मास्क वापरा. हा पॅक बनवण्यासाठी २ टेबलस्पून कॉफीमध्ये २ टेबलस्पून एलोवेरा जेल मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर २५ ते ३० मिनिटे राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
कॉफी आणि नारळ तेल फेस मास्क
दोन चमचे कॉफी पावडरमध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळा. यानंतर हा फेस मास्क चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटे तसाच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा कॉफी फेस मास्क सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्यास मदत करतो.
Declaimer : जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची अॅलर्जी किंवा त्वचा संवेदनशील असेल तर हा मास्क वापरण्यापूर्वी त्वचा तज्ञाचा सल्ला नक्की घ्या.
Previous ArticleSatara : मराठा समाजाचा इतर मागासवर्ग यादीत समावेश करा
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.