आयुर्वेदानुसार खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत. खोबरेल तेलामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, मॅंगनीज आणि लोह भरपूर प्रमाणात असते. याचा फायदा तुम्हाला केस दाट करण्यासाठी, त्वचेच्या समस्यांसाठी होतो. थंडीत कोणत्याही लोशनपेक्षा रात्री तुम्ही खोबरेल तेल लावून झोपलात तरी सकाळी त्वचा मऊ आणि नितळ होते. तुम्ही आठवड्यातून एकदा या तेलाने माॅलिश केल्याने त्वचा तुकतुकीत दिसण्यास सुरु होते. मात्र कधी-कधी अनेकांना खोबरेल तेलाचे साईट-इफेक्ट ही होतात. चला जाणून घेऊया खोबरेल तेल लावण्याचे काय तोटे आहेत?
तेलकट त्वचेच्या लोकांनी खोबरेल तेलापासून दूर राहावे
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी खोबरेल तेल लावू नये. चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचेतील तेलाचे प्रमाण वाढते. त्यामुळे चेहऱ्यावर धूळ आणि घाण चिकटते. यामुळे चेहरा खराब होतो.
पिंपल्स असलेल्या त्वचेवर खोबरेल तेल लावू नये
त्वचेतील घाण आणि धुळीमुळे पिंपल्स होतात. अशावेळी पिंपल्स असलेल्या त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने पिंपल्स वाढण्याची शक्यता वाढते. कारण त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने धूळ आणि घाण सहज जमा होतात.
चेहऱ्यावरील केस वाढतात
खोबरेल तेल केसांच्या वाढीस मदत करते.पण आपण ते आपल्या त्वचेवर लावले तर चेहऱ्याचे केस वाढतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









