Coconut Milk And Recipe : जेवणाची गोडी वाढवणारा नारळ सगळ्यानांच आवडतो. नारळ पाणी, नारळाची बर्फी, लाडू तर सगळ्यांनाच खायला आवडतात. मात्र नारळाच्या दुधापासून अनेक शेक तयार करता येतात याची कल्पना फार थोड्य़ांना असते. ज्यांना दुध प्यायला आवडत नाही. किंवा जे डायट करत आहेत अशा लोकांना या दुधाचा अधिक फायदा होतो. कारण या दुधात फॅट नसतं. आणि दुसरी गोष्ट यात कोणतीही भेसळ होऊच शकत नाही. घरच्या घरी अगदी फ्रेश दूध तुम्ही तयार करु शकता. शिवाय दोन ते तीन दिवस हे फ्रिजला स्टोअर करुन ठेवू शकता. यापासून तुम्ही फ्रूट कस्टड,बनाना शेक,सूप बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला नारळाचे दुध कसे तयार करावे याच्या टीप्स देणार आहोत. सोबतच यापासून तयार होणारे काही पदार्थाच्या रेसीपीची माहिती देणार आहोत.
नारळाचे दुध कसे तयार करायचे
साहित्य
नारळाचे तुकडे- 1 कप
पाणी – 2 कप
कृती
नारळाचे दूध तयार करण्यासाठी सुरुवातीला नारळाचे तुकडे करून घ्या.नारळाचे दूध तयार करण्यासाठी त्याचे प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. आता एक कप नारळाचे तुकडे आणि 2 कप पाणी घ्या. हे मिश्रण मिक्सरमधे घालून एक मिनिट मिक्सर फिरवून घ्या. आता तयार झालेले दूध एका कपड्यातून गाळून घ्या. झाले तयार दूध.हे दूध तुम्ही फ्रिजला स्टोअर करून तीन दिवस ठेवू शकता. उरलेला जो खिस असतो तो तुम्ही झाडाला घालू शकता.
टीप- ओल्या नाराळाचे काप काढण्यासाठी फोडलेला नारळ 30 मिनट फ्रिजरला ठेवा. नारळाच्या कवटीपासून अलगद खोबरे बाजूला होईल.
फ्रूट कस्टड कसे बनवायचे
साहित्य
सफरचंद- 2
चिकू-2
आंबा-2
द्राक्षे-आवडीनुसार
सेंधा मीठ- चिमटभर
गुळाची पावडर- 4 टेबलस्पून
कृती
कोणत्याही प्रकारची किंवा तुमच्या आवडीची चार फळे घ्या. या फळात गोड, मऊ,आंबट अशी चव असावी. आता ही फळे स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर याचे बारीक काप करा. आता दोन कप बारीक केलेले फळाचे तुकडे घ्या. त्यात नारळाचे दूध- दीड कप घाला. तुम्ही नारळाचे दूध तयार करत असताना त्यात गुळाची पावडर आणि सेंधा मीठ चिमटभर घाला. मगच मिक्सरमधून फिरवून घ्या. आता हे दूध तुकडे केलेल्या फळावर घाला. याला 30 मनिट फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर सर्व्ह करा.
बनाना शेक
साहित्य
नारळाचे दूध- दीड कप
कापलेल्या केळाचे तुकडे- 3 कप
खजूर – 6
दालचिनी पावडर- अर्धा चमचा
कृती
नारळाचे दूध, केळाचे तुकडे, खजूर, दालचिनी पावडर मिक्सरमधून फिरवून घ्या.याल दोन आईस क्यूबचे तुकडे घाला. तुम्हाला अजून थोडं गार हव असेल तर थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर शेक प्यायला घ्या.
मिक्स फ्रूट ज्यूस
साहित्य
नारळ दूध – 1 कप
केळी-2
खजूर-3
आयस क्यूब – 2
दालचीनी पावडर- चिमटभर
गोड, क्रंची आणि सॉफ्ट फळे – 1 बाऊल
कृती
मिक्सरमध्ये दूध, केळी, खजूर, आयस क्यूब, दालचिनी पावडर घाला. यानंतर मिक्सरमधून बारीक करुन घ्या. आवडीनुसार तुम्ही यात नट्स अॅड करु शकता. यानंतर फळाचे बारीक तुकडे करून एक कप या प्रमाणात फळांचे तुकडे घाला. यानंतर यात हे मिश्रण ओता. तयार झालं मिक्स फ्रूट ज्यूस
सब्जा ज्यूस
साहित्य
नारळाचे दूध- 1 कप
गुळाची पावडर- दीड टेबलस्पून
केळ- अर्ध
सेंधा मीठ- चिमूटभर
सब्जा बी- 2 चमचे
कृती
वरील सर्व मिश्रण मिक्समधून काढून घ्या. आता एका बाऊलमध्ये 2 टेबलस्पून सब्जा बीज घाला. यात आता मिश्रण घाला. याला 6 ते 7 तास फ्रिजला ठेवून द्या. किंवा रात्रभर भिजवून ठेवला तरी चालेलं. यात आता एक कप बारीक चिरलेली फळे घाला. आणि सर्व्ह करा.