जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
Coconut cracking machine by Tushar Sawant first in Sindhudurg Start Up Yatra
विलवडे गावचे सुपुत्र आणि ओरोस सिंधुदुर्गनगरी आय टी आयचे शिल्प निदेशक फिटर तुषार मुकुंद सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नारळ फोडणी यंत्राचा सिंधुदुर्ग स्टार्ट अप यात्रामध्ये प्रथम क्रमांक आला. याबद्दल त्याना
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याहस्ते आणि जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख २५ हजार रूपयाचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
हे नारळ फोडणी यंत्र तुषार सावंत यांच्या संकल्पनेतून त्यांनी आणि साहिल चव्हाटकर या दोघांनी साकारले आहे. कोणतीही इजा न होता १ मिनिटात २५ ते ३० नारळ सहज या यंत्राद्वारे फोडता येतात. हे यंत्र वजनाने हलके असून किंमतही अत्यंत वाजवी आहे. हॉटेल व्यावसायिकांसाठी हे यंत्र खूप उपयोगी असून महिलाही सहज हाताळू शकतात. या कार्यक्रमाला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एन डी पिंडकुरवार उपस्थित होते.
ओटवणे / प्रतिनिधी









