पर्वरी / दत्ता शिरोडकर
नेरूल येथील निसर्गसौंदर्याने नटलेला जागतिक किर्तीचा ‘कोको बीच’’ आपुऱया सोयीमुळे पर्यंटकांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकात नाराजी पसरली आहे. या भागातील लोकांचा शेती आणि मासेमारी हा मुख्य व्यवसाय पण या समुद्र किनाऱयाला पुरेशी संरक्षण भिंत नसल्याने समुद्राचे खारे पाणी शेतात शिरल्याने आज शेती करणे शक्मय नाही. त्यामुळे शेतकाऱयानी शेती करणे सोडून दिले आहे. त्यामुळे या लोकाना ‘कोको बीच’ हा एकमेव आधार आहे.
नेरूल पंचायत आणि पर्यटन खाते यांच्या अनास्थेमुळे कोको समुद्रकिनारा पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दोन तीन वर्षा मागे समुद्रकिनाऱयावर जाण्यासाठी स्थानिक आमदाराने शेतकरी व अन्य लोकाना विश्वासात घेऊन थेट रास्ता केला होता. तसेच पर्यटक व अन्य लोकाना टॉयलेटची सोय करण्यासाठी टॉयलेट बांधण्याचा प्रस्ताव होता पण स्थानिक कोमुनिदाद यांनी काही करणास्तव ते काम अडविले व बंद पाडले आहे. ते आजवर पूर्ण झाले नाही.
पावसाळय़ात या समुद्रकिनाऱयाची खूप मोठय़ा प्रमाणात धूप होत असते. काही वर्षापूर्वी या समुद्र किनाऱयावरील शंभराहून अधिक नारळाची झाडे (माड) वाहून गेली होती. सरकारने या समुद्रकिनाऱयाची धूप होऊ नये यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. तसेच रोहन बार ते रेईस मागूस पर्यंत संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे. दरवषी पावसाळय़ात संरक्षण भिंत नसल्याने समुद्राचे खारे पाणी शेतात शिरते व शेती नष्ट होते. त्यामुळे येथील बहुतेक लोकानी शेती करणे सोडून दिले आहे आणि पर्यटन व्यवसायात झोकून दिले आहे. आज जर या किनाऱयाची योग्य निगा राखली नाही तर एक दिवस हा समुद्र किनारा पूर्णपणे नष्ट होईल व स्थानिकाना रोजगारा पासून मुकावे लागेल अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
कोको बीच मुळे नेरूल गावाचा पर्यटनदृष्टय़ा मोठय़ा प्रमाणात विकास झाला असता तसेच देशी व परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन पंचयातीचा महसूल वाढला असता व स्थानिकना रोजगरची संधी मिळाली असती. पण सरकार तसेच पंचायत पुढाकार घेत असल्याचे दिसत नाही. जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वी हा समुद्रकिनारा पर्यटकांना खूप आवडू लागला होता. या समुद्रकिनाऱयावर साधारणता पंचवीस टक्के स्थानिक मच्छीमारी आपला व्यवसाय करीत आहेत.
स्थानिक पंचयात आणि पर्यटन खात्याने या किनाऱयाच्या विकासासाठी लक्ष घालून त्याचे सौंदर्यीकरण केले पाहिजे तसेच या किनाऱयाची धूप होऊ नये म्हणून पावसापूर्वी उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.









