मुंबई
शेअर बाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोचीन शिपयार्डचे समभाग घसरणीत राहिले होते. चौथ्या तिमाहीतील खराब निकालाच्या पार्श्वभूमीवर समभाग घसरणीत होते. बीएसईवर इंट्रा डे दरम्यान कंपनीचे समभाग 11 टक्के इतके घसरत 479 रुपयांवर खाली आले होते. चौथ्या तिमाहीत यंदा कंपनीचा निव्वळ नफा मागच्या तुलनेत 83 टक्के कमी होत 47.34 कोटी रुपयांवर घसरला होता. त्याचे पडसाद साहजिकच समभागावर सोमवारी दिसले.









