एका तस्कराला पोलिसांकडून अटक
► वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम पोलिसांनी शनिवारी कचार जिह्यात 10 कोटी ऊपयांचे हेरॉईन जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे. साहिद अहमद (32) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो करीमगंज येथून ट्रकमध्ये हेरॉईन घेऊन जात होता, असे पोलीस अधीक्षक नुमल महत्ता यांनी सांगितले.
कचार जिल्हा पोलीस आणि करीमगंज जिल्हा पोलिसांनी संयुक्त कारवाईत कचार जिह्यातील सिलचर येथील सिंकूरी रोड येथे 1.4 किलो हेरॉईन असलेले 100 वड्या जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 10 कोटी रुपये आहे. जप्त केलेले ड्रग्ज मिझोरामच्या चांफई जिह्यातून आणण्यात आले होते.









