प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी 40 कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी एक कतारच्या दोहा येथून बेंगळूरला आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
विदेशातून अमली पदार्थ आणण्यात येत असल्याची माहिती मिळताचच डीआरआय अधिकाऱ्यांनी बेंगळूर विमानतळावर प्रवाशांच्या लगेजची तपासणी केली. यावेळी दोहाहून आलेल्या भारतीय प्रवाशाची बॅग तपासणी असता दोन कॉमिक्स आढळले. त्यात सीलबंद केलेल्या स्वरुपात 4 किलो कोकेन आढळून आले. या प्रकरणी प्रवाशाला अटक करून एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.









