वृत्तसंस्था/ चेन्नई
सीमाशुल्क विभागाने शनिवारी चेन्नई विमानतळावर 1,201 ग्रॅम कोकेन जप्त केले. आंतररराष्ट्रीय बाजारात याची किंमत 12 कोटी ऊपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्देमालासोबतच एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. चेन्नई एअर कस्टम्सने आदिस अबाबाहून आलेल्या नायजेरियन पासपोर्ट असलेल्या पुरुष प्रवाशाला थांबवून चौकशी केली असता त्याच्याकडे 1,201 ग्रॅम कोकेन सापडले. प्राथमिक चौकशीअंती त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अटकेची कारवाईही पूर्ण करण्यात आल्याची माहिती कस्टम विभागाकडून देण्यात आली.









