देणार झोमॅटो, स्विगीला टक्कर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेव्हरेजेसच्या क्षेत्रात कार्यरत असणारी लोकप्रिय कंपनी कोकाकोला यांनी भारतातील स्टार्टअप कंपनी थ्राइव्हमध्ये हिस्सेदारी घेणार असल्याचे सुतोवाच केले आहे. या हिस्सेदारीनंतर कोकाकोला थेटपणे झोमॅटो, स्विगी यांना टक्कर देणार असल्याचे सांगितले जात आहे. खाद्य पदार्थांची ऑर्डर नोंदवणारी थ्राइव्ह ही स्टार्टअप कंपनी असून जवळपास 5500 इतक्या
रेस्टॉरंटस्सोबत भागीदारी कोकाकोला करणार असल्याचे समजते. या हिस्सेदारीमुळे कोकाकोलाला आपल्या पेयांची व खाद्यपदार्थांची ऑर्डर पोहोच करणे सोपे होणार आहे. थ्राइव्ह यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंटस्चे जाळे असल्याने याचा फायदा करुन घेण्यासाठी कोकाकोला आग्रही असणार आहे.









