आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कामागिरी : 11 टक्क्यांची उत्पादनात वाढ
कटक :
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 997 मेट्रिक टन इतक्या विक्रमी स्तरावरती कोळशाचे उत्पादन घेण्यात आले आहे. 2022-23 वर्षांमध्ये 893 मेट्रिक टन इतके कोळशाचे उत्पादन घेतले होते. त्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता यावर्षी कोळसा उत्पादनामध्ये 11 टक्के इतकी वाढ केली आहे. ही वाढ उल्लेखनीय अशीच मानली जात आहे.
कोळसा मंत्रालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. सरकारने निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार 2030 पर्यंत 1.5 अब्ज टन इतक्या कोळशाचे उत्पादन वार्षिक स्तरावर करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. कॅलेंडर वर्ष 2024 पर्यंत 15 डिसेंबर अखेर 988.32 मेट्रिक टन इतके कोळशाचे उत्पादन घेण्यात आले होते. वर्षाच्या आधारावर पाहता ही वाढ सात टक्के नोंदली गेली आहे.









