वनविभागाची कारवाई, एकावर गुन्हा
चिपळूण
गेल्या काही महिन्यात टेरव येथे कोळसा भट्ट्यांवर कारवाई होत असताना देखील कोळसा भट्ट्या धगधगत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी टेरव -अडरे गावच्या सीमेवर कोळसाभट्टी आढळून आली आहे. ही भट्टी उध्वस्त करून कोळसा जप्त करण्यात आला आहे
टेरव येथे गेल्या काही महिन्यात कोळसा भट्ट्यांवर येथील वन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. काहींवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया पाहता कोळसा भट्ट्या धगधगणार नाहीत, अशी अटकळ होती. मात्र, वनविभागाच्या पथकाने टेरव- अडरे गावच्या सीमेवर अवैध कोळसा भट्टीवर कारवाई करून सदरची भट्टी उध्वस्त केली आहे. तर या ठिकाणी तयार झालेला कोळसा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष राजाराम कदम ( रा.टेरव ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई. सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड, परिशेत्र वनाधिकारी. सरवर खान यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस एस सावंत, राहूल गुंठे, वनरक्षक कोळकेवाडी यांनी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








