एप्रिल-ऑक्टोबरमध्ये35.19 कोटी टन
नवी दिल्ली
सरकारी मालकीच्या कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) चे कोळसा उत्पादन चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात 17.4 टक्क्यांनी वाढून 35.19 कोटी टनाच्या घरात पोहोचले आहे.
सीआयएलने मंगळवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत त्यांचे उत्पादन 35.19 कोटी टनवर पोहचले, जे मागील वर्षी याच कालावधीत 29.96 कोटी टन होते. या सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये 5.29 कोटी टन कोळशाचे उत्पादन केले होते. वर्षभरापूर्वी याच महिन्यात सीआयएलचे कोळसा उत्पादन 4.98 कोटी टन होते. कंपनीने सांगितले की, आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात 38.57 कोटी टन कोळशाची मागणी वाढून गेल्या वर्षी याच कालावधीत 36.47 कोटी टन राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
आघाडीवरच्या 37 खाणींपैकी 25 खाणींची सप्टेंबरमध्ये उत्पादन क्षमता ही 100 टक्केपेक्षा जास्त होती तर इतर 5 खाणींची उत्पादन क्षमता 80 ते 100 टक्के इतकी राहिली होती. आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत कोल इंडियाच्या उत्पादनात 20 टक्के वाढ दर्शवली गेली आहे.
देशांतर्गत कोळसा उत्पादनात कोल इंडियाचा वाटा 80 टक्क्यांहून अधिक आहे.









