वास्को-लोंढा वाहतूक ठप्प : दुऊस्ती काम युद्धपातळीवर, काही रेल्वे रद्द तर काहींच्या मार्गात बदल
बेळगाव : मालवाहू रेल्वेचे डबे घसरण्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास सोनावळ ते दूधसागर रेल्वेस्थानकादरम्यान घडली. दगडी कोळसा वाहतूक करणाऱ्या मालवाहू रेल्वेचे 17 डबे ऊळावरून घसरले. यामुळे लोंढामार्गे वास्कोकडे जाणारी वाहतूक खोळंबली. खबरदारी म्हणून या मार्गावरील काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला. दगडी कोळशाने भरलेले रेल्वेचे डबे घसरल्याने रेल्वेमार्गाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील काही तास दुऊस्तीचे काम चालणार असल्याने इतर एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने तात्काळ या ठिकाणी 140 टन क्रेन पाठवून रेल्वेमार्गाच्या दुऊस्तीचे काम सुरू केले. तसेच घसरलेले डबे पुन्हा ऊळावर आणण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी मेहनत घेत होते. रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शुक्रवारी रात्रीही काम सुरूच होते. नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव, अतिरिक्त व्यवस्थापक के. एस. जैन त्याचबरोबर रेल्वे विभागीय अधिकारी हर्ष खरे हे देखील रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्नशील होते.
निजामुद्दीन एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गे
वास्को-लोंढा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने निजामुद्दीन एक्स्प्रेस शुक्रवारी कोकण रेल्वेमार्गे धावली. यशवंतपूर-वास्को एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस शुक्रवारी कोकण रेल्वेमार्गे धावली. शनिवार दि. 10 रोजीही गोवा एक्स्प्रेस कोकण रेल्वेमार्गे धावणार असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.









