वृत्तसंस्था/पर्थ
भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर काही वैयक्तिक समस्येमुळे मायदेशी परणार असल्याचे सांगण्यात आले. आता ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन व भारत यांच्यात दोन दिवसांचा सरावाचा सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यावेळी गंभीर उपस्थित राहणार नाहीत.
भारतीय क्रिकेट संघाने पर्थची पहिली कसोटी जिंकली. या कसोटीनंतर प्रशिक्षक गंभीर यांनी काही वैयक्तिक समस्यांमुळे भारतीय संघाबरोबर कॅनबेरा येथे जावू शकले नाहीत. मात्र अॅडलेडच्या 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी गंभीर ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. गंभीर यांच्या अनुपस्थितीत अभिषेक नायर, रेयान टेन डुश्चेटी आणि मॉर्नी मॉर्कल यांच्याकडे प्रशिक्षकाची जबाबदारी राहिल.









