विरोधकांच्या आरोपावर सरकारचे स्पष्टीकरण
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘Co-Win’ denies allegation of data leak
देशवासियांच्या डेटा लीक संदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला असून त्यावर जोरदार राजकारणही सुरू आहे. टेलीग्राम या डिटेल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. कोविड लसीकरण पोर्टल ‘को-विन’वरून करोडो भारतीय लोकांचे आधार, पासपोर्ट आणि पॅन कार्ड क्रमांक तसेच बडे नेते आणि पत्रकार यांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचा आरोप झाल्यानंतर याप्रकरणी सरकारकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
डेटा लीकसंबंधी अहवाल समोर आल्यानंतर आता विरोधी पक्षांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. कोविड-19 लसीकरण अॅप ‘को-विन’च्या मदतीने गोपनीयतेचा भंग केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी मोदी सरकारवर केला आहे. केंद्र सरकारने हा आरोप फेटाळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय यासंबंधी तपशीलवार अहवाल तयार करत असून तपास सुरू असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. को-विन पोर्टल डेटा गोपनीयतेसाठी पूर्णपणे सुरक्षित असून डेटा भंगाचे सर्व अहवाल निराधार आणि खोडसाळ असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.









