Shirol Raid By Cooperative Department : कोल्हापूर- सहकार विभागाने काल शिरोळ तालुक्यातील एका सावकाराच्या घरावर छापा टाकला. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील धनपाल निगाना भमाणे, सदाशिव धनपाल भमाणे आणि अजित अम्मान्ना गोरवाडे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यांच्या विरोधात अवैध सावकरीची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्याकडे दाखल झाली होती.
या पथकाने छापा टाकून तपासणी केली असून काही कागदपत्रे पथकाच्या हाती लागले आहेत. सहकार विभागाच्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। अजित गोरवाडे हे बाहेरगावी असल्याने त्यांचे राहते घर सील करण्यात आले आहे. तर भमाणे यांच्या घरातून ५० आणि शंभर रुपयांची स्टॅम्प पेपरवरील सहा करारपत्रे आणि नव खरेदी पत्रे जप्त केली आहेत.
Previous Articleपिळर्णमधील आगीवर अखेर नियंत्रण
Next Article सोमवारपासून विधानसभा परिसरात 144 कलम लागू









