ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंधरा ते वीस दिवसांत राज्यात काय बदल होईल ते महाराष्ट्र बघेल. बदल होणार आहे, आमची सत्ता येणार नाही. पण सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री असतात तेव्हा कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. दोन उपमुख्यमंत्री असतात, तेव्हा मुख्यमंत्री नसतात. तिघंही कधी एकत्र येत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी जेवणाचे आमंत्रण दिले त्याला उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. यावरून राज्यात सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट होत आहे.
सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चाललं आहे. येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पासून बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल.