मविआ सरकार कोसळण्याच्या बेतात आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने चालला आहे असे सूचक ट्विट संजय़ राऊत (Sanjay Raut)यांनी केले आहे. यानंतर ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देणार का याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे सरकार अल्पमतात आले आहे. आज एक वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)पत्रकार परिषदेत काय सांगणार हे पाहावे लागणार आहे. ८० टक्के शिवसेना आमदार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मविआचे संख्याबळ कमी झाल्याने मविआ बरखास्तीची शिफारस करणार असल्याचे बोलले जात आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री राजीनामा देणार का हे समजणार आहे. कालपासून राजकीय नाट्य सुरु झाले आहे. या नाट्याला आता वेगळेच वळण लागले आहे. राज्यपाल यांच्याकडे विधानपरिषद बरखास्त करण्याची मागणी करणार असे बोलले जात आहे. त्यातच सत्तास्थापनेची सर्व जबाबदारी टीम देवेंद्रकडे देण्यात आली आहे. त्यातच अपक्ष आमदार गीता जैन या सागर बंगल्यावर पोहचल्या आहेत. सुरवातीला त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्य़ानंतर आता त्या भाजपला पाठिंबा देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहेत. त्या गुवाहाटीला जाणार असल्याचे बोलले जात आहेत. दरम्य़ान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील शिंदेंच्या गटात सामील झाल्य़ाची माहिती समोर आली आहे. ते गुहावटीला रवाना झाले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









