ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत आज सभा असून त्यांच्या सभेतून विरोधकांना करारा जवाब मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सभेत मुख्यमंत्री भाजप, मनसे आणि राणा दाम्पत्यावर निशाणा साधण्याची शक्यता आहे. तसेच सभेसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मला एका शिवसैनिकानं विचारलं तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं संबंध काय? म्हणे मुन्नाभाईमध्ये जसे संजय दत्तला गांधी दिसतात तसे आपल्याकडे आहेत एक असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. हे कधी शाल घेऊन फिरतात, तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. मात्र, मुन्नाभाई चित्रपटातील मुन्नाभाई लोकांचं भलं करत होता याचं काय? शेवटी संजय दत्तला कळत आपल्या डोक्यात केमिकल लोचा आहे, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, असे अनेक मुन्नाभाई फिरत असून त्यांना फिरुद्यात असं म्हणत राज ठाकरेंवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून देत सोमय्यांना सॉसची बाटली कुणी दिली? सॉसचा फोटो आल्यावर दिल्लीतून पत्र आलं, आम्हाला काय विचारता, सुरक्षा तुम्ही दिली ना…विचारा सॉसची बाटली कोणी दिली.
आता दाऊतच्या मागे लागले आहेत. उद्या त्याला पक्षात घेऊन मंत्रीही बनवतील. – उद्धव ठाकरे
काँग्रेससोबतर असलो, तरी ह्रदयातलं हिंदुत्व सोडलेलं नाही. मी विधानसभेत बोललोय. सत्ता असो वा नसो, परवा नाही. आमचं हिंदुत्व तकलादू नाही, ते खरं आहे. हिंदुत्व सोडायला काय धोतर वाटलं का, कधी नेसलं, कधी सोडलं. सोडायला लाज तुम्हाला नसेल वाटत, पण हिंदुत्व नेसण्याची, सोडण्याची गोष्ट नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आम्ही उघडपणे गोलो. पण तुमच्यासारखे न सांगता पहाटे शपथ घेतली नाही, असे म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला. – उद्धव ठाकरे
मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न केले तर, तुकडे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. 1 मे जेव्हा साजरा करत होतो, तेव्हा भाजपाची सभा होती. तेव्हा सभेत फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होते ते ओठात आले. आम्ही मुंबई स्वतंत्र करणार असे ते म्हणाले होते. यावर हल्लाबोल करत मुंबई मराठ माणसाने रक्त सांडून मिळवलेली आहे. त्यामुळे मुंबईचे लचके तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू. – उद्धव ठाकरे
मुंबई फक्त तुम्हाला ओरबाडण्यासाठी पाहिजे. ज्या ज्या वेळा मुंबईवर आपत्ती येते, तेव्हा शिवसेना कार्यकर्ते पहिल्यांदा धावून जातात. कोणतीही आपत्ती येऊ द्या. तो इतरांना मदत करत असतो. रक्तदान करण्यासाठीही अंगात मर्दाचं रक्त असावं लागतं. ते शिवसेनेत आहे. – उद्धव ठाकरे
तुम्ही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मागवलीये का? शिवसेना स्वतंत्र लढ्यात नव्हती पण माझे आजोबा, वडील आणि काका होते. महाराष्ट्र स्वतंत्र लढयात सगळ्यात आधी जनसंघ फुटली. तसेच आरएसएस स्वातंत्र्य लढ्यात कोठे होती हे सांगा. त्यामुळे हिंदुत्व काय आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही. मुंबई फोडण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत. महागाई – हिंदुत्व श्वास, मराठी प्राण महागाईबद्दल कोणीच बोलत नाही असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबो केला. कोविड सभेत मोदींनी इलाज सांगितला. मुंबईवर संकट आले की, आधी धावून जाणार शिवसेना, शिवसैनिक आहे. – उद्धव ठाकरे
जी गाढवे आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. आमचे हिंदुत्व गदाधारी होते, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडले. आम्ही गध्याला सोडून दिले. कारण काही उपयोग नाही त्याचा असे म्हणत त्यांनी भाजपवर घणाघात केला. – उद्धव ठाकरे
तुमच्याप्रमाणे मलाही मोकळं वाटतंय जरा. बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलोय. अनेक विषयांवर बोलायचंय. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे








