उद्भवलेल्या पूरपरिस्थीतीवर आलमट्टी संदर्भात तोडगा काढण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर पत्रव्यवहार चालू असून सरकारने यासंदर्भात काय पावले उचलली यावर विधानसभेत विषय मांडणार असल्याचे कॉग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. तसेच येत्या काही दिवसात कोल्हापूरच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले आहे.
पावसाळी अधिवेशनाला जाण्यापुर्वी ते आज विधानसभेच्या प्रांगणात मांध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, “आलमट्टीच्या पणीपातळीसंदर्भात अधिकाऱ्य़ांच्या स्तरावर सहकार्य चालू आहे. ते राजकिय स्तरावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहाप करणार आहे. तसेच आलमट्टीसंदर्भात ज्यापदधतीने निर्णय व्हायला हवे त्यासंदर्भात सरकारने काय पवले उचलली आहेत याबद्दल मी विधानसभेत चर्चा करणार आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “२०१९ आणि २०२० चा अनुभव पाहता यावेळीही तिच परिस्थिती ओढावेल अशी भिती वाटत आहे. पाण्याची पातळी वाढेल तसा हा धोका वाढणार आहे. मागील महापूराशी दोन हात करण्यासाठी ज्या काही उपाययोजना आपण राबवल्या त्याच यावेळीही सरकरने राबवाव्यात.” असाही सल्ला त्यांनी सरकारला दिला.
तसेच “सध्या राधानगरीचे ४ दरवाजे उघडले आहेत. सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुराबाबत आलमट्टीच्या पाणीपातळीला एक विशेष महत्व आहे. अधिकारी पातळीवर जे काही सरकार्य झाले आहे, ते राजकिय पातळीवर नेऊन कर्नाटक सरकारने योग्य ती पावले उचलावीत योसाठी कर्नाटक सरकारला विनंती करणार आहे. कर्नाटक सरकारशी बोलणी सुरु असली तरी पाउस वाढला तर त्याचा परिणाम नक्कीच जनसामान्यांवर होणाऱ” असाही इशारा त्यांनी दिला.
जत तालुक्यात नागरिकांनी केलेल्या आंदोलनावर भाष्य करताना आमदार पाटील म्हणाले, “जत तालुक्यासह महाराष्ट्राच्या इतर सिमारेषेवर नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर सरकारने काय पावले उचलली यावर मी चर्चा करणार आहे.” असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले “कोल्हापूरच्या राजकारणात अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. सहकारीतील निवडणूका वेगळ्या असतात. लोकसभेला हेच चित्र असणार आहे का याची कोणतीही कल्पना नाही. पण लोकांना चुकीचे चालले आहे हे कळत असून सरकारविषयी त्यांची नाराजी स्पष्ट दिसून येत आहे. अजून स्थानिक स्वरांज्या संस्थांच्या निवडणूका असून बदलत्या राजकिय घटनांचा परिणाम या निवडणूकांर होणार आहे. सुप्रिम कोर्टानेही सत्य लोकांसमोर आणले आहे. त्यासंदर्भात विधानही केले आहे. ” असही ते म्हणाले.








