महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढी पाडव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयात भेट घेतली. राज ठाकरेंच्या सभेच्याच दिवशी शिंदे यांनी भेट दिल्याने मनसे-शिंदे गट युतीची घोषणा होणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.गुढी पाडव्यानिमित्त शिवतीर्थावर संध्याकाळी 7 :30 ला सभा होणार आहे. शिवाजी पार्कवरील राज गर्जनेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या सभेत राज ठाकरे काय बोलणार आणि कुणावर निशाणा याची उत्सुकता मनसैनिकांना लागली आहे.दरम्यान या भेटीने मनसे-शिंदे गट युती होणार का असा सवाल ही उपस्थित केला जात आहे.
राज ठाकरे यांच्या सभेला मनसैनिकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. राज ठाकरे काय तोफ डागणार याची उत्सुकता लागली आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक या सभेला हजेरी लावत आहेत. त्यातच शिंदे यांच्या भेटीने या सभेला वेगळे वळण लागतयं का? मनसे-शिंदे गटामध्ये मनं जुळली का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारल्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील म्हणाले की, मनं जुळली किंवा मतं जुळली का? हे सगळं आमचे पक्षप्रमुख राज ठाकरे ठरवतील.आज पहिल्यांदा गणपती संस्थानच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले होते.त्यावेळी मीही तिथेच होतो.त्यांना मी विनंती केली की मनसेचं कार्यालय बाजुलाच आहे,येता का? यानंतर मुख्यमंत्र्यांनी विनंतीला मान देत मनसे कार्यालयाला भेट दिली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








