खेड / प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोळीबार मैदानात रविवारी सायंकाळी होणाऱ्या जाहीर सभेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. यापूर्वी झालेल्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना नेते रामदास कदम कसा खरपूस समाचार घेतात? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सभेच्या पार्श्वभूमीवर अवघे वातावरण भगवेमय झाले असून बॅनरबाजीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ही सभा रेकॉर्ड ब्रेक करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून त्यादृष्टीने सभेला विराट जनसमुदाय उसळणार आहे. या विक्रमी सभेनंतर सभा घेण्याचे कोणीही धाडस करणार नाही, असा टोलाही आमदार योगेश कदम यांनी सभेपूर्वी लगावला आहे. सभेसाठी येणाऱ्या गाड्यांची पार्किग व्यवस्था चेख केली असून, पोलीस प्रशासनाने सभेत गोंधल होवू नय म्हणून चोख बंदोबस्त केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









