ऑनलाईन टीम मुंबई
दोन दिवसापूर्वीच शिंदे-भाजप सरकार हे सहा महिन्यापेक्षा टिकणार नाही या शरद पवारांच्या वक्तव्यानंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पावरांच्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी ही एक सदिच्छा भेट असल्याचे मुख्यमंत्र्याकडून सांगण्यात आले आहे.
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात शिंदे- भाजप युतीने सत्ता स्थापन केली. 30 तारखेला आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर एकनाथ शिंदे यांनी 4 तारखेला विधानसभेत आपले बहूमत सिध्द केले. पण माध्यमांशी बोलताना या युती विषयी शरद पवार शाशंक असल्याचे दिसून आले. त्यांनी नवीन सरकार 6 महिन्यापेक्षा टिकू शकणार नाही असा दावा केला होता.
विधानसभेत आपल्या भाषणात सर्वांचे आभार मानताना आपण राज्यतील सर्व प्रमुख नेत्यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या राजकीय भेटींची सुरवातच शरद पवार यांच्यापासुन केली. याभेटीमुळे राजकिय वर्तृळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी ही एक सदिच्छा भेट होती असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी सांगितले.