सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील रेठरे हरणाक्ष येथील एका शेतकऱ्याने पुरग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान खात्यात जमा झाल्यानंतर लावलेल्या फलकाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Eknath Shinde Raju Shetti : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील रेठरे हरणाक्ष येथील एका शेतकऱ्याने पुरग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान खात्यात जमा झाल्यानंतर लावलेल्या फलकाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचा फोटो असलेला बॅनर लावल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या फोटोसह ‘एकदम ओके’ पुरग्रस्त प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये दिल्याबद्दल जाहीर आभार असा आशयाचा फलक लावल्याने शेतकरी वर्गामध्ये चर्चा सुरु आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमित कर्जधारकांना पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले होते. सरकार संकटात असताना घाई गडबडीत याची घोषणा करण्यात आली होती, पण ती फक्त घोषणा राहिली होती.मात्र या सरकारने प्रत्यक्ष कृती केल्याने एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तर राजू शेट्टी यांच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दलही आभार मानले आहे.








