बऱ्याच वेळी मुख्यमंत्री येत असताना वाहतूक पोलीस रस्त्यावरील ट्राफिक अडवून धरत मुख्यमंत्री येण्याच्या रस्त्यावर विशेष बंदोबस्त लावतात. मात्र सर्वसामान्यांना याचा त्रास होऊ नये तसेच वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडीचा वाहन चालकांना मनस्ताप होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या ट्विटवर देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारल्यानंतर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरला आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको असे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा- बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, प्रेम खरं की खोटं …
काय म्हटलं आहे ट्विटमध्ये
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने जाताना सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको,असे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी पोलिसांना दिले. ताफ्यासाठी वाहतूक रोखल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका अडकल्यास रूग्णाच्या जीवितासही धोका होऊ शकतो. हे सर्वसामान्यांचे सरकार असून त्यात व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य राहील असे म्हटले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









