बेळगांव शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या केंद्रीय बसस्थानकाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 27-12-2022 रोजी सायंकाळी 06.00 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगांव जिल्हा प्रभारी तथा जलसंपदा मंत्री गोविंदा कारजोळ, मुजराई हज व वक्फ मंत्री श्रीमती शशिकला जोल्ले, परिवहन व अनुसूचित जमाती कल्याण मंत्री बी श्रीरामुलू आणि नगरविकास मंत्री बी. ए. बसवराज उपस्थित होते. नवीन बसस्थानकाच्या उद्घाटनात सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी केली आहे.









