ऑनलाईन टीम / मुंबई
गुजरात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गुजरात मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यंत्री पदाचा राजीनामा दिला असून गुजरातचे मुख्यमंत्री म्हणुन भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले आहे.
मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, गेल्या सहा महिन्यात पाच मुख्यमंत्री बदलणाऱ्या भाजपाला राष्ट्रीय काँग्रेसने लगावलाय. याच बरोबर भाजपने आपली सत्ता असणाऱ्या राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून खांदेपालट करण्याच्या हालचाली सूरु केल्या आहेत. हाच धागा पकडत राष्ट्रीय काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला असून ट्विटरवर #CM_नहींPMबदलो ही मोहीम सुरु केली असून या अंतर्गत मोदींचे पंतप्रधान म्हणून अपयश अधोरेखित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
तसेच सत्ता असणाऱ्या राज्यांत भाजप खांदेपालट करत आहे. कारण भाजप संपुर्ण भारतात अपयशी ठरला आहे. मात्र मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, या साठी पंतप्रधान बदलने आवश्यक आहे. असा टोला काँग्रेसने लगावला आहे. मोदी सरकार अपयश लपवण्याऐवजी स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार असा ही सवाल एका ट्वीटमध्ये काँग्रेसने केला आहे.